Monday, 24 July 2017

सुंदर बोधकथा नक्की वाचा

एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला.  नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''

देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.

प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.
पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला.

 पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.
थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,

'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.

 त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

 सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.
आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.
तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले.

सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते.

हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''
आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

*तात्पर्य:-*

जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही.......

आवडले असल्यास नक्की शेर करा जेणेकरून सर्वाना त्यांचा जीवनातील संघर्षाचे महत्व कळेल. नक्की वाचा

आवडले असल्यास नक्की शेर करा जेणेकरून सर्वाना त्यांचा जीवनातील संघर्षाचे महत्व कळेल.

Sunday, 16 July 2017

* त्रिकोणा किल्ला -पावसाळी ट्रेक *

         शनिवार , दि .१५ जुलै २०१७ रोजी त्रिकोणा किल्ला , ता.मुळशी येथे पावसाळी ट्रेक मित्रांसोबत केला . तब्बल  २० वर्षांनी मी या गडावर पाऊल ठेवले . मला त्यावेळच्या मित्रांबरोबर या किल्यावर केलेल्या ट्रेकची आठवण पुन्हा एकदा झाली. असो !
          आम्ही सायंकाळी ४ .२५ वाजता तिकोणापेठ गावातून किल्ला चढायला सुरवात केली . सोबत पुण्यातील आपटे प्रशालेतील माझे सहकारी शिक्षक श्री . मोहन कटके , श्री . संतोष वाटाडे , अमोल हरभरे व गणेश पंडित हे होते . हिरवाईने सह्याद्रीच्या रांगा नटलेल्या आहेत. जणू काही पृथ्वीने हिरवा शालूच परीधान केला आहे . निसर्गाचे हे सुंदर रूप डोळयात कायम साठवून ठेवावसं वाटतं . सर्वांनी खूपच छान पावसाळी ट्रेकचा अनुभव घेतला . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किल्ला सर केल्यानंतर वेगळाच आनंद झाला . सर्वानी ' जय भवानी जय शिवाजी ', ' हर हर महादेव ' अशा घोषणा दिल्या . या आमच्या उत्साहात सोबतीचे ट्रेकर्सही सहभागी झाले . या किल्यावर कुटुंबासोबत एक ४ वर्षाचा व दुसरा ५ वर्षाची मुलेही ट्रेक करताना दिसत होती . या मुलांकडे पाहुन आम्हा सर्वांना ती जणू प्रेरित करित होती असे वाटू लागले .
     ३५ मिनिटांतच गडावर पोहोचलो . उंचावर जणू आम्हाला ढगच स्पर्श करत आहेत असे वाटू लागले . आजूबाजूला काहीच दिसत नव्हते . फक्त पांढरे -शुभ्र ढगच हळूवार अंगाला स्पर्श करत होते .ढगाची व  धुक्याची लाट कमी झाल्यावर पश्चिमेला तुंगी किल्ला, पायथ्याशी पवना धरण, ऊत्तरेस लोहगड व विकासागड किल्ले हलकेसे दिसू लागले .निसर्गाचे सौंदर्य खूपच छान वाटत होते . क्षणभर असे वाटले की आज गडावरच मुक्काम करावा . पण ते शक्य नव्हते . जस जसशी सायंकाळ होऊ लागली , अंधार पडू लागला तस तसा पावसाचा व वाऱ्याचा वेग वाढू लागला . सुरक्षारक्षकाने सर्व गिरीप्रेमींना गडावरून खाली उतरण्यासाठी सूचना दिल्या . मग प्रत्येकाची पावलं गडावरून खाली उतरण्याकडे धावू लागली .पायथ्याशी ६ वाजता पोहोचलो . दोघात एक असे एका स्वीट कॉर्नचे दोन भाग करून प्रत्येकाने स्वीट कॉर्नवर ताव मारला अन् आमची गाडी पुण्याच्या दिशेने निघाली ...

शब्दांकन : - भगवान पांडेकर
दि .१५ /०७ /२०१७