Wednesday, 14 June 2017

करिअर मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम जून २०१७

१०वी नंतर पुढे काय ?
करिअरचे नियोजन का व कसे करावे ? 
पालकांनी आपल्या पाल्याका करिअर निवडताना कशी मदत करावी ? कोणत्या बाबींची काळजी घ्यावी ?
अशा अनेक विषयांवर आज बुधवार दि .१४ जून २०१७ रोजी व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था पुणे येथे इ .१०वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना अॅप्टीट्युड टेस्टींगवरून करिअर मार्गदर्शन व समुपदेशन पालकांसमवेत करण्यात आले .


Wednesday, 8 February 2017


👉 _*पालकांनो, घराचा तुरुंग करू नका

मुलांची परीक्षा जवळ आली की, टीव्ही बंद करणं, मुलांचे खेळ बंद करणं, त्याला घराबाहेर पडू न देणं. अशा गोष्टी पालकांकडून सर्रास केल्या जातात. मात्र यामुळे मुलांवर परीक्षांचा अनावश्यक ताण पडतो हे लक्षात घ्या. संध्याकाळचा एक ते दीड तास त्यांनी अभ्यासाशिवाय घालवणं, मैदानी खेळ खेळणं यात काही गैर नाही उलट यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचा ताण हलका होत असेल तर त्यांना तसंही करू द्यावं. शिवाय नुसतं पडून त्यांना टीव्ही पाहावा असं वाटत असेल तर तोही पाहू देण्याची मुभा पालकांनी विनाकटकट द्यावी.

परीक्षेच्या काळात टीव्ही वगैरे बंद ठेवण्याची गरज नाही.जेवणाच्या फक्त त्यांना टीव्ही नेहमीपेक्षा र्मयादित काळापुरता पाहू द्यावा. घरात अभ्यासाशिवाय दुसरी काही चर्चाच नको, असं वातावरण ठेवू नये. तसेच नाश्त्याच्या वेळेस,  वेळेस हलक्या-फुलक्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारून वातावरणातील ताण निवळावा. एकूणच काय तर मुलांच्या परीक्षांच्या काळात घराचा तुरूंग करू नका... तसेच मुलांनी परिक्षेच्या काळात काय खावं आणि काय टाळावं? ते जाणून घेऊयात...



_*मुलांनी काय खावं, काय टाळावं?*_

👉 या काळात काही मुलांना खूप भूक लागते, तर काही मुलं काहीच खात नाही. ही दोन्ही त्यांच्यावरील अतिताणाची लक्षणं आहे. त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेत त्यांना विशिष्ट अंतरानं खायला द्यावं.

👉 दिवसातून दोनच वेळा मुलांना पोटभर जेवायला न देता चार वेळा विभागून थोडं-थोडं खायला द्यावं.

👉 मधल्या वेळेच्या खाण्यात त्यांना फळं, सुकामेवा खाण्यास द्यावा.

👉 परीक्षेला जाण्याआधी त्यांना लिंबू सरबत द्यावं.

👉 परीक्षेवरून आल्यावर त्यांना धपाटे, धिरडे असा थोडा चटकदार खाऊ दिला तरी चालेल.
असतील
👉 प्रथिनं असलेला आहार मुलांना द्यावा.

👉 मुलं पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसत  तर पहाटे उठल्यावर त्यांना नुसताच चहा किंवा दूध देऊ नये. त्याबरोबर फळे किंवा सुकामेवा द्यावा. हे दोन्ही नसतील तर पोळी किंवा बिस्किटं पण चालतील. तसेच मुलं रात्री अकरानंतर जर अभ्यास करत असतील तर रात्री नुसताच चहा न देता थोडं खायलाही द्यावं. नुसत्या चहानं मुलांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.

👉 मुलांना परीक्षेच्या काळात बाहेरचं किंवा जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. आपल्या हातानं बनवलेलं ताज-ताजं मुलांना खायला द्यावं.

👉 परीक्षेचा काळ म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. त्यांच्या शरीरात पुरेसं पाणी जाण्याची आवश्यकता असते. तेव्हा थोड्या-थोड्या वेळानं त्यांना पाणी प्यायला द्यावं. मधून-मधून सरबत द्यावं. फळांच ज्यूस देऊ नये त्यापेक्षा लिंबाच्या सरबताला प्राधान्य द्यावं.

पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना तुमच्याकडून शिस्तीची, सूचनांची किंवा तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर तुमच्या सहकार्याची, संवादाची गरज असते. तसेच आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करत बसू नका. त्यांना प्रेमानं सहकार्य करा. त्याच्यातील गुणांची, क्षमतांची, त्याच्यातील ताकदीची त्याला जाणीव करून द्या...
........... ✍

Tuesday, 7 February 2017

"स्कूल टू करिअर " या चार्टचे" प्रकाशन



रविवार दि .२९ / ०१ / २०१७ रोजी "स्कूल टू करिअर " या चार्टचे प्रकाशन विद्यार्थ्यांच्या हस्ते लोणावळा येथे संपन्न झाले.